मंगळ ग्रहावर उतरलेल्या रोव्हरचा व्हिडिओ पाहिलात का?

0
56

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर उतरलेल्या पर्सिवरेंस रोव्हर लँडिंगचा व्हिडिओ जारी केला आहे. या रोव्हरने गुरुवारी मंगळ ग्रहावर लँडिंग केली होती. व्हिडिओत मंगळ ग्रहावर उतरतानाचा आवाज रेकॉर्ड झाला आहे. हा आवाज रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर उडलेल्या धूळ आणि मातीवर पडलेल्या दबावामुळे रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येत आहे. नासाच्या व्हिडिओत पर्सिवरेंस रोव्हर लाल आणि सफेद रंगाच्या पॅराशूटमधून मंगळाच्या पृष्ठभागावर उतरताना दिसत आहे. हा व्हिडिओ 3 मिनिटं 25 सेकंदाचा आहे.

पर्सिवरेंस रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर त्याचा मायक्रोफोन काम करणं बंद केले होते. मात्र काही वेळानंतर मायक्रोफोन सुरु झाल्याने वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.