एक दिवस माथेरानच्या राणीसोबत!

0
67

माथेरान हे मुंबईकरांचे फिरण्यासाठी सर्वात जवळचं आणि आवडतं ठिकाण..एक दिवसाचा प्रवास म्हणून नेहमीच पर्यटकांची या थंड हवेच्या ठिकाणाला पसंती असते. माथेरान रानी मिनी ट्रेनमधून फिरण्यास सर्वांनी पंसती दर्शवली आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी धावू लागली. तेव्हापासून आतापर्यंत हळूहळू करत 14 सर्व्हिसेस अमन लॉज ते माथेरान सुरु केल्या आहेत. हा प्रवास जंगलातून जातो आणि एकूण 20 किलोमीटरचा प्रवास आहे 12 फेब्रुवारीला एका दिवसात 1070 जणांनी माथेरानच्या राणीतून प्रवासाठी तिकीट बुक केले होते. मध्य रेल्वेही या पर्यटन स्थळाला चालना देण्यासाठी योगदान देत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलातही भर पडत आहे