राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण

0
36

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. हि माहिती त्यांनी स्वतः हा त्यांच्या ट्वीटरवरून दिली आहे. ते सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले असून त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलाय.

तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वःताची टेस्ट करून घ्यावी करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.