मंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

0
27

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईकही उपस्थित होते. संजय राठोड मंत्रिपदासोबत आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तत्पूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असा दबाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होता. संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या छबीला धक्का लागला होता. त्यात महिला अत्याचार प्रकरणी सरकार गंभीर नाही, असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या चौकशीत राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मंत्रिपदाचा भार कुणावर असेल याकडे राजकीय जाणकारांचा नजरा लागून आहेत.