मंत्रालयात आता 2 शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम!

0
33

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. आपल्या राज्याचे सर्व कामकाज मंत्रालयातून केलं जात, त्यामुळे मंत्रालयाच्या कामाच्या शिफ्टमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मंत्रालयात दोन शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबद्दल सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागाच्या सचिवांनी कर्मचारी विभागणी करावी, असे आदेश देण्यात आले आहे.