शिवसेनेच्या पोस्टरवर मनसे कार्यकर्त्यांनी चिटकवल्या ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ मजकुराच्या चिठ्ठ्या

0
119

भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्वागतासाठी याचे काही पोस्टर सुद्धा अनेक ठिकाणी लावण्यात आले आहे. मात्र मुंबईतील बोरिवलीत या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला गेला. यामुळे त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही चिठया चिटकवण्यात आल्या यामध्ये ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अश्या प्रकारचे मजकूर लिहिण्यात आले होते.