मनसे नेत्याने डान्सबारचा VIDEO आणला समोर, कोरोनाचे नियम धाब्यावर

0
52

सध्या राज्यभरात कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये म्हणून राज्यसरकारकडून अनेक प्रकारचे नियम लावले जात आहे. थोड्याच वेळापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल मुख्यमंत्री यांनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. याविषयी एक ते दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

संक्रमण वाढू नये यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु काही लोकं या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. असाच एक डान्सबारचा व्हिडिओ मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी समोर आणला आहे. मुंबईतील बोरिवलीमधील एका डान्सबारमधील हा व्हिडिओ आहे, या डान्सबारमध्ये  कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. या बारमध्ये कुणीही मास्क घातलेले नव्हते किंवा सोशल डिस्टन्ससिंगचे नियम देखील पाळले गेले नव्हते.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पब्ज आणि बारला मध्यरात्रीनंतर सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे पब्ज सुरू असल्याचे समोर आले आहे.