मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

0
73

26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे (manse)यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचे वक्तव्य केले होते.त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका इथे तोडफोड केली होती.त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे हे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले होते.यामध्ये आज राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला .

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार
  • प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा
  • मागील वेळेस कोर्टात हजर  न राहिल्याने त्यांना समन्स बजावण्यात आलेय
  • राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर