उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंंत्र्यांची भेट

0
135

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतंय. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.तसेच उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली होती भेट