एमपीएससीच्या पूर्व परीक्षा आता 21 मार्चला, विद्यार्थ्यांना दिलासा

0
36

राज्यसेवा पूर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती, मात्र त्यावर  विद्यार्थीच नव्हे तर विरोधी पक्षासह, सत्ताधारी पक्षात सुद्धा नाराजी होती. त्यावर विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना एमपीएससीच्या निर्णयाबद्दल ही परीक्षा पुढील आठवड्यात घेणार अशी मोठी घोषणा केली. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारित तारीख जाहीर केली. 14 मार्चला होणारी परीक्षा कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली होती. तसेच आता सुधारित तारखेनुसार 21 मार्च रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.