मुकेश अंबानी प्रकरणातील ‘त्या’ स्कॉर्पियो ड्रायव्हरचा गुन्हे शाखेला सुगावा

0
45

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर पोलीस तपासानं वेग धरला आहे. आता मुंबई गुन्हे शाखेच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागला आहे. मुलुंड टोल प्लाझाकडून एक संशयित इनोव्हा गाडी रात्री 3 वाजू 5 मिनिटांनी ठाणे शहरात आल्याचे दिसत आहे. या गाडीत स्कॉर्पिओचा चालक तोंड लपवून मागे बसल्याचे दिसत आहे. आता हाती हा सुगावा लागल्यानंतर घोडबंदर, ठाणे, नाशिक, भिवंडी येथील सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखा हाती घेत आहे. इनोव्हा गाडीची नंबर प्लेट खोटी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.