मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रोखण्याची मोहीम

0
36

मुंबईत गेल्या काही दिवसात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे महापालिकेने आता ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना आणि सिनेमागृह इत्यादी ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ज्या इमारतीत पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत ती इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे सांगत मिशन झिरोमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.