मुंबईतील कोविड सेंटर पुन्हा सुरु होणार, आयुक्तांचे आदेश

0
35

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता मुंबई महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बंद केलेली सर्व कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. एका आठवड्यात सेंटर सुरु करण्याचे सह आयुक्तांना निर्देश दिले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यापासून काही कोविड सेंटर बंद करण्यात आली होती. आता सात जम्बो आणि प्रत्येक विभागात एक अशी कोविड केंद्रे सुरु आहेत. मुंबईतील कोरोना सेंटरमध्ये 70 हजार 518 बेड्स उपलब्ध असून त्यापैकी 13 हजार 136 बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत. आयसीयू, ऑक्सिजन, रुग्णवाहिका, औषधोपचार या सर्वांचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.