कोरेगाव भीमा प्रकरण: वरावरा राव यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

0
96

एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांना सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव वरावरा राव यांना जामीन दिला असून त्यांना मुंबईत राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तपासात सहकार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणात वरावरा राव यांना मागील जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राव यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.