मुंबईत कोरोना नियमावली मोडण्याऱ्या हॉटेल्सवर कारवाई

0
43

मुंबईत कोरोनाचा फैलाव पाहता प्रशासन पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. मास्कसोबत गर्दीच्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची करडी नजर आहे. अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोडवरी काही हॉटेल्स आणि पब्सवर अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संदर्भातील नियमावली मोडल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हॉटेल्स चालक मालकांना इशारा दिला आहे. नियमावली न पाळल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णामुळे चिंता व्यक्त केली. त्यामुळे मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळा अन्यथा लॉकडाऊन पुन्हा लागू करावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.