मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली कोरोनाची लस

0
38

महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी कोविड सेंटरमध्ये जाऊन व्हॅक्सिन घेतली आहे. लस घेतल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे महापौर काही वेळ बीकेसीच्या  कोविड सेंटरमध्ये थांबणार असून डॉक्टरांच्या परवानगीनंतरच महापौर तिथून निघणार आहेत.

इथे येणाऱ्या प्रत्येकाने मनाची तयारी करून यावं, असं आवाहन महापौरांनी लस घेतल्यानंतर केलं आहे. तसेच त्या म्हणाल्या, कि आम्ही आता एक सिस्टम सुरू करतोय, ज्यामध्ये नोंदणी आमच्याकडे होईल. मोठ्या मनपा रुग्णालयात दोन सेंटर वेगळे करून लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर यांनी दिली.

तसेच विरोधकांनी लसीकरणाचं राजकारण करू नये. मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज वाटत नाही, मुंबईत कोरोनाचा कहर सध्या नाहीये, वरिष्ठ निर्णय घेतील, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.