मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेत भर; महापौरांकडून नागरिकांना समज

0
31

मुंबईत लॉकडाऊनमधील नियम शिथील केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊनची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा धीम्या गतीच्या लोकलने प्रवास केला. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले. तसेच प्रवाशांना कोरोनाबाबतच्या त्रिसूत्रीचे महत्त्व पटवून दिले