मुंबईत पेट्रोलची वाटचाल शंभरीकडे!

0
44

मुंबई- इंधन दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल किंमती शंभरीकडे वाटचाल करत असून हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमत शतक गाठेल असे चिन्ह आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल 94.33 रुपये प्रति लिटर आहे. तर दिल्ली 88.44 रु., कोलकाता 89.73 रु., चेन्नई 90.70 रु. प्रति लिटर पेट्रोलची किंमत झाली आहे.