मुंबईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या

0
43

मुंबई: कुरार परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला कुरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणात सुबोध दीपक साळवी 26, सौरभ सुनील पोस्टे 23, समीर मन्नान खान 22, सिद्धेश मंगेश इंगळे 20 आणि समीर संतोष पार्टे 27 या पाच आरोपींना अटक केली आहे. तर विकास मोहिते याच्यासह आणखी दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन सुरे, दोन कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड, नायलॉन दोरी, तीन मोटारसायकल हा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत.