‘सावधान इंडिया’च्या 2 क्रू मेंबर्सचा अपघाती मृत्यू, 20 तासांची शिफ्ट भोवली?

0
29

‘सावधान इंडिया’च्या दोन क्रु मेंबर्सचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी 4.30 वाजता दोघे 20 तासाची शिफ्ट संपवून घरी बाईकवरून जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. अपघातात मृत्यू पावलेला प्रमोद हा ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाचा असिस्टेंट आर्ट डायरेक्टर होता. तर मृत्यू पावलेला दूसरा क्रू मेंबर मदतनीस म्हणून काम करत होता. या प्रकरणानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईज खडबडून जागे झाले आहे. इतके तास शिफ्ट केल्याचे कारण चॅनेलला विचारणार आहे.