२४ तासात मुंबईला मिळणार नवे पोलीस आयुक्त! कुणाची लागणार वर्णी? 

0
39

मुंबई: सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगयांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या 24 तासांपासून मुंबई पोलीस आयुक्त बदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे नवीन मुंबई पोलीस आयुक्त कोण? हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोणाला पसंती देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.यामध्ये रजनिष शेठ यांचं नाव समोर येत आहे नुकतेच ते गृहमंत्र्यांना भेटून बाहेर आले आहेत
मुंबई पोलीस आयुक्त.. या पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशातही आहे. मुंबई पोलीस दलात आजवर काम केलेल्या आणि काम करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाने मुंबई पोलीस आयुक्तपदाला आज जगभर मान दिला जातो. एकदा तरी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा मुकुट घालावा अशी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची इच्छा असते. त्यामुळे नवीन मुंबई पोलीस आयुक्त कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत रजनीश शेठ?
1988 बॅचचे रजनीश शेठ हे शांत आणि हायप्रोफल चमकेशगिरी करणारे नसून कधीच कोणत्या वादात सापडले नाही. भाजप काळात जसं स्वच्छ चारित्र्याचे लो प्रोफाइल आणि कायदा सुव्यवस्था राखणारे दत्ता पडसलगीकर हे पोलीस आयुक्त होते. तसेच आयुक्त आता महाविकास आघाडीला पाहिजेत म्हणून रजनीश शेठ यांचे नाव जास्त चर्चेत आहे.