मुंबईचा युपीवर धडाकेबाज विजय, चौथ्यांदा विजेतेपदावर कोरलं नाव 

0
36

मुंबईच्या संघाने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशला पराभूत केले आणि जेतेपदाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघापुढे ३१३ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईच्या संघाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत उत्तर प्रदेशवर विजय सहा विकेट्स राखून साकारला.
मुंबईचा सलामीवीर पृथ्वी सावने यावेळी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. पृथ्वीने सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेशच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. पृथ्वीच्या धडाकेबाज फटकेबाजीमुळे मुंबईच्या संघाला यावेळी ८९ धावांची सलामी मिळाली. या स्पर्धेत पृथ्वी साव हा सातत्याने दमदार फलंदाजी करत होता. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रमही पृथ्वीने आपल्या नावावर केला.