मुलुंडमध्ये वडील आणि आजोबांची हत्या, हत्येनंतर तरुणाची आत्महत्या

0
45

अंगावर काटा येईल असा प्रकार मुंबईत आज घडला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये आज सकाळी एका शार्दुल मिलिंद मांगले नामक तरूणाने वडील आणि आजोबांची हत्या केली आहे. त्यानंतर तो तिथेच न थांबता त्याने स्वत: बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या देखील केली आहे. मुलुंड येथील स्थानिक पोलिस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची चौकशी सुरु आहे. तसेच या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.