अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

0
37

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि बसचा भीषण अपघात झाला. श्री क्षेत्र देवगड येथे समोरासमोर धडक बसल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट गाडीचा चुराडा झाला. त्यामुळे स्विफ्टमध्ये असलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेले पाचही जण जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.