नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध, नितीन राऊत यांची माहिती

0
30

नागपुरामध्ये सुरु असलेला लॉकडाउन आता 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली होती.

आजच्या या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर 31 मार्चपर्यंत कठोर निर्णय लागू राहणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. तसेच शहरात कठोर नियम लावण्याबाबत लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.