‘महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष होईल’

0
28

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष होईल. तसेच राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला. या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना असं महाविकास आघाडीचे सरकार आहे. दुसरीकडे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नाना पटोले यांनी दिलेल्या वक्तव्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत रॅली काढली. यावेळी शेतकरी आंदोलनावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले.