नंदा खरे अन आबा महाजन यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

0
26

लेखिका नंदा खरे अन बालसाहित्यिक बाबा महाजन यांनी
साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.याबाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन करत म्हणाले ‘ नंदा खरे हे त्यांच्या साहित्यातून नेहमीच एक वेगळा विचार देतात आणि वाचकांना आत्मपरिक्षणही करायला लावतात. पुरस्कारप्राप्त “उद्या” या कादंबरीत भविष्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे त्यांनी केलेले टीकात्मक विश्लेषण वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाही.
मुलांची भाषा जाणणारे आबा महाजन यांनी देखील कथा, कविता या माध्यमातून मुलांचे भावविश्व अचूक रेखाटले. मी या दोन्ही साहित्यिकांचे मनापासून अभिनंदन करतो. मराठी साहित्य क्षेत्रातील नवे लेखक निश्चितच यातून  स्फूर्ती घेतील असा मला विश्वास वाटतो.