वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी खेळाडू ठरली नाओमी ओसाका 

0
48

जपानची स्टार खेळाडू नाओमी ओसाकाने
अवघ्या 23 वर्षांच्या वयात चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलं.तिनेे यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर मात केली.मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेला हा सामना ओसाकाने सरळ सेट्समध्ये 6-4, 6-3 असा जिंकला. तिच्या कारकिर्दीतला हा चौथा ग्रँड स्लॅम आहे. यापूर्वी 2014 मध्ये नाओमीने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदही जिंकले आहेत.

23 वर्षीय नाओमी ओसाका दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशिप जिंकणारी 12 वी महिला खेळाडू ठरली. 2018 आणि 2020 साली तिने यूएस ओपनही जिंकले होते. 2019 साली ओसाका टेनिस महिला एकेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारी ती पहिली आशियाई खेळाडूही बनली. आता या विजयावर बेल्जियमची माजी टेनिसस्टार जस्टिन हेनाने सुद्धा ओसाकाचं कौतुक केल म्हणाल्या,”महिला टेनिसला नवी बॉस मिळाली”.