नरेंद्र मोदींचा जो बायडेन यांना फोन; जाणून घ्या फोनामागचं कारण

0
45

जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या आहे. ट्वीट करत नरेंद्र मोदींनी याबद्दलची माहिती दिली आहे. भारत-अमेरिकेचे संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. “जो बिडेन यांच्याशी बोललो आणि त्यांना यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. आम्ही प्रादेशिक विषयांवर चर्चा केली. हवामान बदलाच्या विरोधात आपले सहकार्य पुढे नेण्याचेही आम्ही मान्य केले’. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, अध्यक्ष जो बिडेन आणि मी नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि सुरक्षेसाठी आपली सामरिक भागीदारी बळकट करण्यासही उत्सुक आहोत” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

  • नरेंद्र मोदी यांचा जो बायडेन यांना फोन
  • नरेंद्र मोदींनी दिल्या जो बायडेन यांना शुभेच्छा
  • भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा
  • आम्ही प्रादेशिक विषयांवर चर्चा केली – मोदी