राज्यसभेत मोदींच्या डोळ्यात अश्रू

0
125

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपण्यात असून, हे चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत या चारही नेत्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निरोप समारंभात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाले आणि मोदींच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. गुजरातमधील यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना मोदींनी गुलाम नबी आझाद यांनी त्याप्रसंगी कशा प्रकारे मोदींना वेळोवेळी फोन करत परिस्थितीचा आढावा घेतला आणि काळजी व्यक्त केली यावर भाष्य केलं. “माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे” असं म्हणतंच नरेंद्र मोदी भावूक झाले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

  • राज्यसभेत नरेंद्र मोदी झाले भावूक
  • गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना मोदींच्या डोळ्यात अश्रू
  • राज्यसभेतील 4 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण
  • कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांना देण्यात आला निरोप