बीडमधील ‘या’ लग्नसोहळ्याची देशभर चर्चा! मंगलाष्टकांऐवजी गायले राष्ट्रगीत 

0
34

बीडमध्ये एक आगळावेगळा सोहळा पार पडला.या सोहळ्याची देशात चर्चा होत आहे. या लग्नात कोणतीही मंगलाष्टका किंवा धार्मिक विधी न करता हे जोडपे लग्नबंधनात अडकले. अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड पार पडला. HIV बाधित कुटुंबातील अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या हा अनोखा विवाह सोहळा.

धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे अनाथ जोडप्यांनी कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता लग्न पार पडले विशेष म्हणजे वंदे मातरम् म्हणून हा विवाह संपन्न झाला. हा विवाह सोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला.  या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले हे माझं भाग्यच असल्याची भावना मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.