न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती

0
48

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार म्हणाले, “1 फेब्रुवारी पासून कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे कार्यक्रम हे साधेपणाने घ्यावे लागत आहेत. राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचे आहे. सर्व विकासकामे जोरात सुरु आहेत, पाणी हे जीवन आहे, त्याचा योग्य वापर करा, पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरु केला”
आजचा हा कार्यक्रम रायगडसाठी महत्वचा आहे. 400 कोटीपेक्षा जास्त खर्च न्हावाशेवा पाणीपुरवठा योजनेसाठी केला जातोय. शहरीकरण, औद्योगीकरण वाढत आहे. त्यामुळे त्यासाठी पाणी पुरवठा सुद्धा वाढवावा लागणार आहे. केंद्रकडून जीएसटीची मोठी रक्कम अजून येणे बाकीच आहे. पायाभूत सेवेसाठी आम्ही कुठेही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही. कोस्टल रोड, मेट्रो, बोगदे, गोवा- मुंबई हायवे त्यांचे काम सुरू आहे. राजकारण न आणता कोकणचा कायापालट व्हावा, असे अजित पवार यांनी नमूद केले.येवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे ,आदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कार्यक्रमाला 50 जणांची मर्यादा असून सोशल डिस्टन्सिंगमध्ये कार्यक्रम सुरू आहे.