नवाब मलिक यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

0
205

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते नारायण राणे हे गेल्या 22 वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत आणि आता पुन्हा ते स्वप्न पाहू लागले आहे. आता त्यांना देवेंद्र फडणवीस यांची चांगली साथ मिळाली आहे. दोघेही एकाच पदासाठी एकत्र स्वप्ने पाहू शकतात, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.