राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे अडकल्या लग्नबंधनात 

0
611

नाशिक: आमदार सरोज अहिरे ह्या डॉक्टर प्रविण वाघ यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडल्या आहेत. त्या नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत.हा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडला.आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे ,सर्वोसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा हजेरी लावली आहे.अतिशय मोजक्या मंडळींच्या अन मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त मंडळींना आमंत्रण न देता मोजके नातेवाईक आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.