राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे. जे रुग्णालयात घेतली कोरोना लस

0
39

देशात लसीकरण मोहिमेला सुरवात झालेली आहे.यामध्ये आता लसीकरणाचा दुसरा टप्पा आज 1 मार्च पासून सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणाऱ्यांना लस देण्यात आली.आता दुसऱ्या टप्यात जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारोना प्रतिबंधक लस टोचून घेतली .ते दुपारी दोन वाजताच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित होत्या. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आहे. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा लस घेण्यासाठी पोहचले होते. पवार यांची सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात आली.