“भाजपावर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे”

0
43

“बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपाने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाअध्यक्ष केल्याची माहिती पोलीस धाडीत समोर आली असून भाजपावर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे”, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. दरम्यान “भाजपाच्या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी”, अशी मागणी महेश भारत तपासे यांनी केली असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांना यासंदर्भातील त्यांनी निवेदन दिले आहे.