नीरा डावा कालव्याची अजितदादांकडून पाहणी

0
84
SOURCE- AJIT PAWAR TWITTER HANDLE
SOURCE- AJIT PAWAR TWITTER HANDLE

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (रविवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. बारामतीत प्रगतीपथावर असलेल्या नीरा डावा कालव्याच्या बांधकामाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार बारकाईने प्रत्येक कामाचा आढावा घेतला. बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याचे मजबूतीकरण, नूतनीकरण करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतले आहे . जलसंपदा, बारामती नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सहा कि.मी. लांबीच्या या कालव्याचे नूतनीकरण व सौंदर्य वाढविण्याचे काम केले जात आहे. हा कालवा बशीच्या आकाराचा झाला होता, त्याला पूर्वीचे स्वरुप देण्याचा प्रयत्न सुरु आहे.