नव्या कोरोना स्ट्रेनमुळे चिंता वाढली

0
33

देशात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन मिळाल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटेन, दक्षिण आफ्रिकेनंतर आता भारतात नवा कोरोना स्ट्रेनचा फैलाव होत असल्याचं दिसत आहे. भारतात आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन यूके स्ट्रेनपेक्षा घातक असल्याचे जाणकारांचं म्हणणं आहे. SAR4-CoV-2चे S N44OKआणि E484Q व्हेरिएंट महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगानात आढळून आले आहेत. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांचा त्याच्याशी थेट संबंध नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत रिसर्च सुरु आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 81 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 43 टक्के, पंजाबमध्ये 31 टक्के, काश्मीरमध्ये 22 टक्के, छत्तीसगडमध्ये 13 टक्के तर हरयाणामध्ये 11 टक्के रुग्ण वाढले आहेत.

दूसरीकडे महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाबमधून दिल्लीत येणाऱ्या नागरिांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य केले आहे. तरच दिल्लीत येता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.