करीना-सैफच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन! 

0
39

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर अन सैफअली खान यांना पुन्हा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. करीना, सैफ बरोबरच तैमुरची पॉल्यूलॅरीटी सुद्धा खुप आहे.यामध्ये आता तैमुरला भाऊ झाल्याची माहिती रिद्धीमा कपूर सहाणीने ट्विट करत दिली.शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . यामध्ये रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली. करीना कपूर ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती जिने गरोदरपणाच्या शेवटपर्यंत काम केले आहे. प्रेग्नेंट असतांना तिच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.