पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा व्हिडिओ जारी, बघा व्हिडिओ

0
44

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात बालाकोट स्थित ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्रार्क करत त्यांना नेस्तनाबूत केले होते.याच घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याच दरम्यान पाकिस्तानकडून शनिवारी विंग कमांडर अभिनंदन यांचा एक नवा व्हिडीओ जाहीर करण्यात आला आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून ‘बालकोट एअरस्ट्राईक’ करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ १६ विमानांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले होते. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मोठ्या बहादुरीने यातील एफ १६ विमान पाडले होते. परंतु, याच प्रयत्नात त्यांचे विमान पाकिस्तानात जाऊन कोसळले होते. यानंतर पाकिस्तानने १ मार्च रोजी भारताकडे सुपूर्द केले होते.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा एक व्हिडिओ पाकिस्तानने शेअर केला आहे. हा त्यावेळचा आहे जेव्हा ते पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात होते. पाकिस्तानी सेनेसमोर ते आपला अनुभव व्यक्त करत होते. परंतु, या व्हिडिओत अनेकदा छेडछाड केल्याच स्पष्टपणे दिसत आहे.या व्हिडिओत विंग कमांडर अभिनंदन दोन्ही देशांच्या समानता व्यक्त करताना दिसत आहेत.