एनआयएने पश्चिम बंगालमधील संशयित दहशतवाद्यांविरोधात दाखल केले आरोपपत्र

0
40

एनआयएने पश्चिम बंगाल अन केरळमधील अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मुर्शिद हसन याच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल अन केरळ राज्यात अल कायदा तरुणांना प्रोत्साहित करून आपल्या जाळ्यात ओढत होती, त्याच माहितीच्या आधारे एनआयएने हा गुन्हा दाखल केला होता.

अल कायद्याशी संबंधित दहशतवादी देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कट आखत होते. केरळ अन पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली