लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागू 

0
45

लातूर: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू केले आहेत.यातच आता लातूर जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारपासून (15 मार्च) लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलीये. तसे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी दिले आहेत. हा कर्फ्यु रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत असेल. तसेच येत्या 31 मार्चपर्यंत आठवडी बाजारदेखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.