औरंगाबादमध्ये १४ मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

0
42

विदर्भात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.येथील जिल्ह्यांमध्ये दररोज हजारो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावती शहरात तर भयानक परिस्थिती आहे. अचलपूरमध्ये अनेक कुटुंबांना बाधा झाली आहे. त्यामुळे तिथे आठवड्याभरासाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. प्रशासनाने औरंगाबाद शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 14 मार्चपर्यंत असणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत उद्योग अन आरोग्य व्यवसाय वगळता बाकी सगळे बंद राहणार आहे. याबाबतचा निर्णय नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.