नाशिकमध्ये उद्यापासून नाईट कर्फ्यु, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

0
43

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढायला सुरवात झाली आहे. कोरोनाची वाढता फैलाव लक्षात घेता राज्यातील तीन जिल्ह्यांनी कोरोना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कडक निर्णय घेतले आहेत.विदर्भातील अकोला, यवतमाळ व अमरावती या तीन जिल्हात पुन्हा लॉकडाऊन लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये उद्यापासून (22 फेब्रुवारी) नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत घोषणा केली आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल.लग्नाला गर्दी करु नका असे आवाहन भुजबळ यांनी केलय तसेच लग्न सोहळ्यासाठी परवानगी बंधनकारक असेल.