टूलकिट प्रकरणात निकिता जॅकब फरार घोषित

0
30

टूलकिट प्रकरणात पर्यावरणवादी दिशा रवि हिला अटक केल्यानंतर आता तिच्या सहकाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. दिशाच्या अटकेनंतर सहकारी निकिता जॅकब फरार आहे. यासाठी दिल्ली पोलिसांना निकित जॅकबविरोधात कोर्टातून अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. 11 फेब्रुवारीला निकिताा जॅकबच्या घरी पोलीस तपासणीसाठी गेले होते. तिथे पोलिसांनी मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची तपासणी केली. मात्र रात्री उशिर झाल्याने निकिताची चौकशी होऊ शकली नाही. त्या दिवसापासून निकिता फरार आहे.