नितीन राऊत यांनी दिला मिथुन चक्रवर्तींना अप्रत्यक्षपणे टोला

0
41

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो पोस्ट करत सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्तीं यांना चांगलाच टोला लगावला आहे. मिथुन चक्रवर्तीं यांनी औपचारिकपणे भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

नितीन राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर करत म्हणाले कि, ”कोई कह रहा था बंगाल मै भाजपा ने डोर टू डोर चुनावी कैपेन शुरू कर दिया है” अस म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या मिथुन चक्रवर्ती यांना टोला लगावला आहे. त्या फोटोमध्ये एक कोब्रा दारावर उभा आहे असा तो फोटो आहे.

काही दिवसापूर्वी मिथुन चक्रवर्तीं एका सभेत त्यांच्या फेमस डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन करत होते. तेव्हा ते म्हणाले की, ‘मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.’ त्यानंतर त्याचं वाक्य चांगलंच चर्चेत आले होते. यानंतर आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक ट्वीट करत मिथुन यांची अप्रत्यक्षरित्या टोला दिला आहे.