नागपूरमध्ये लॉकडाऊन नाही मात्र कठोर निर्बंध लागू!

0
55

नागपूर: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरवात झाली आहे. यामध्येच नागपुरात सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढतोय. परंतु तूर्तास लॉकडाऊन केले जाणार नसून कठोर निर्बंध लावले जातील अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागपूर शहरामध्ये कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.