२८ मार्चपासून पुण्याहून या शहरांसाठी नॉनस्टॉप विमानसेवा, स्पाइसजेटचा मोठा निर्णय

0
45

पुण्याहून पाच मोठ्या शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय खासगी विमान कंपनी स्पाइसजेटने घेतला आहे. २८ मार्चपासून हि विमानसेवा सुरु होणार असल्याचे एका निवेदनाद्वारे या कंपनीने माहिती दिली आहे. तसेच वाराणसी, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि दरभंगा या पाच शहरांसाठी हि विमानसेवा सुरु होणार असून किमान 66 नवीन फ्लाईट्स सुरू करणार आहे.

स्पाइसजेट ही पहिली कंपनी आहे, जी पुण्याला विमानाद्वारे दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या शहरांशी जोडणारी असे त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.