सोनेगावमध्ये काही युवकांनी कुख्यात गुंड नीलेश राजेश नायडू (वय ३१) याची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. या घटनेत त्याचा साथीदार प्रतीक सहारे गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी भेंडे लेआउट परिसरात उघडकीस आली. नीलेशविरुद्ध लुटपाट, हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी आदींसह अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून त्याला कारागृहात डांबले. शुक्रवारी तो जामिनावर बाहेर आला होता.
या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.घडलेल्या घटनेने सोनेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच सोनेगाव अन गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून नीलेशचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केल्या गेला.घटनास्थळपासूनच काही अंतरावरच निलेशचा साथीदार प्रतीक जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून सोनेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.तसेच मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला आहे.