आता भाजपाने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे – नवाब मलिक

0
51

४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपाने देखील गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. विधानभवनाच्या मिडिया हाऊस येथे मंत्री नवाब मलिक यांनी ही मागणी केली आहे.

जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी असं देखील ते म्हणाले आहेत. तसेच दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

पाहा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची याविषयावरील प्रतिक्रिया खालील लिंकवर :